उरण : एलिफंटा बेटावर उत्खननात आढळलेले महाकाय साठवणूक जार. 
मुंबई

Elephanta Island discovery | एलिफंटा बेटावर आढळले महाकाय साठवणूक जार

पुढारी वृत्तसेवा

राजकुमार भगत

उरण : मुंबई जवळील जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावरील मोराबंदर येथे सुरू असलेल्या उत्खननात पुरातत्व विभागाला मोठे यश मिळाले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उत्खननात प्रचंड आकाराचे दोन साठवणूक जार सापडले असून, यामुळे बेटाच्या प्राचीन व्यापारी इतिहासातील एका नव्या अध्यायाचा उलगडा झाला आहे.

मोराबंदर येथील उत्खनन सध्या सहा वेगवेगळ्या पॉकेटस्मध्ये सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, एका विशिष्ट पॉकेटमध्ये मिळालेले अवशेष थक्क करणारे आहेत. उत्खननात दोन मोठे जार सापडले आहेत. त्यातील एकाची उंची 1.25 मीटर आहे, तर दुसर्‍या तुटलेल्या जारचा व्यास 1.22 मीटर इतका आहे. हे जार पाणी साठवण्यासाठी वापरले जात असावेत असा अंदाज आहे. येथे रोमन म्फोरा, पश्चिम आशियातील टॉर्पेडो जार, चायनीज पोर्सिलेन आणि ‘टर्क्वाइझ ग्लेझ वेअर’चे अवशेष सापडले आहेत. यावरून इ. स. 4 थ्या आणि 5 व्या शतकात या बंदराचा रोम आणि पश्चिम आशियाशी थेट व्यापार असल्याचे सिद्ध होते. जार सापडलेल्या ठिकाणापासून 80 मीटर अंतरावर विटांनी बांधलेली आणि खडकात कोरलेली पुरातन पाण्याची टाकी सापडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT