उच्च न्यायालय  file photo
मुंबई

Ganpat Gaikwad legal case : माजी आमदार गणपत गायकवाड यांना हायकोर्टाने जामीन नाकारला

उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये गोळीबाराची घडली होती घटना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः उल्हासनगर येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केलेले भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला. न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी गणपत गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्यात जामीन मंजूर केल्यास कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, या तत्त्वाला धक्का बसेल, असे न्या. बोरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, 2 फेब्रुवारी 2024 रोजी प्रतिस्पर्धी राजकीय गटांचे कार्यकर्ते हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये एकत्र आले आणि एकमेकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

रात्री 9.30 च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कल्याण अध्यक्ष महेश गायकवाड आणि इतर दोघे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये बसले होते. त्यावेळी गणपत गायकवाड व त्यांचे सहकारी केबिनमध्ये घुसले आणि महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT