गणेशोत्सवासाठी एलटीटी-मडगाव दरम्यान ६ विशेष गाड्या File Photo
मुंबई

Ganeshotsav special trains : गणेशोत्सवासाठी एलटीटी-मडगाव दरम्यान ६ विशेष गाड्या

मरेवरून गणपती विशेष गाड्यांची संख्या आता ३०२

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. आधी जाहीर केलेल्या २९६ गणपती विशेष ट्रेन व्यतिरिक्त या ६ ट्रेन चालवण्यात येणार असून, यामुळे गणपती विशेष ट्रेनची एकूण संख्या आता ३०२ झाली आहे.

०१००३ साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवारी २५ ऑगस्ट, ०१ सप्टेंबर व ८ सप्टेंबर रोजी ८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. ०१००४ साप्ताहिक विशेष गाडी मडगाव येथून रविवारी २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट व ७ सप्टेंबर रोजी १६.३० वा. सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ६ वा. लो. टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी..

गाडीची रचना : १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

आरक्षण: गणपती विशेष गाडी क्रमांक ०१००३ साठी आरक्षण ५ ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू होईल. अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार आकारले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT