मुंबई : गणेश चतुर्थी 27 ऑगस्टला असली तरी 2 ऑगस्टपासून मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन सुरू होणार आहे. मात्र, पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने, प्राधान्याने खड्डे दुरुस्ती हाती घेतली जाणार असून गणरायाच्या आगमण व विसर्जन मार्गात यावर्षी खड्डे विघ्न नसेल असा दावा केला आहे.
मुंबई महापालिकेने हाती घेतलेली मिशन रस्ते काँक्रिटीकरण50 टक्के पर्यंतच पूर्ण झाले आहे. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महापालिकेने तत्काळ खड्डे बजविण्यासाठी मुंबईकरांसाठी पोटहोल क्विकफिक्स अॅप ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. या अॅपवर आतापर्यंत मुंबईकरांनी सात हजारांपर्यंत खड्डे पडल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. यावरून मुंबईत या वर्षी गणरायाचे आगमण व विसर्जनात खड्डे विघ्न असणार आहे. मात्र, महापालिकेने तक्रारींचा तत्काळ निपटारा केला जात असून आतापर्यंर्र्त साडेचार हजारांपर्यंत खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. आता गणपती आगमण व विसर्जन मार्गांवर पालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे.
गणेश चतुर्थी 27 ऑगस्टला असल्यामुळे मुंबई बाहेरील गणपती बाप्पांचे आगमन होऊ लागले आहे. 2 ऑगस्टपासून मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे आगमन होणार आहे. या आगमनाच्या वेळी खड्ड्यांचे विघ्न नको म्हणून तत्काण दुरुस्ती मोहीम हाती घेतली असून शहर, पश्चिम व उपनगरात एकाचवेळी खड्डे बुजवले जाणार आहेत.
मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव व दादर येथील प्रमुख रस्ते हे महत्त्वाचेगणरायचे आगमण मार्ग आहेत. तर गिरकाव, दादर, माहीम, जुहू, वेसावे, सात बंगला, गोराई या चौपाट्यांकडे जाणारे विसर्जन मार्ग असून येथील खड्डे तत्काळ बुजवावेत असे पालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 10 ते 30 फुटापर्यंत उंच मुर्ती असतात. खराब रस्त्यांमुळे गणेश मूर्तींची ट्रॉली खड्ड्यात फसणे, मूर्तीला तडे जाणे, मूर्ती बॅलन्स न होणे, आदी भीती असते. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही मागणी केली आहे.
2 ऑगस्ट व त्यानंतर येणार्या शनिवार आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मुंबईच्या परेल वर्कशॉप व भारतमाता येथून मोठ्या प्रमाणात गणेशाचे आगमन होणार आहे. आगमन व विसर्जन दरम्यान लटकणारे केबल, वाढलेल्या फांद्या तसेच भारतमाता, डिलाई रोडवर असलेले सिग्नलचे पोल बदलणे, लालबाग परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणे, रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या गाड्या हटवण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.