मुंबई; पुढारी वृत्तसेवा : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी दहिसर येथील दौलतनगर हिंदू स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे पार्थिव जे. जे. रुग्णालयात विच्छेदन करून सकाळी 10 वाजता बोरिवली येथील दौलतनगर या त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आदींनी पार्थिवाचे दर्शन घेतले.