Free parking now available at 10 locations in South Mumbai
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण मुंबईतील पालिकेच्या ‘ए’ वॉर्डमध्ये कुलाबा येथील 10 ठिकाणी नवीन निविदा निघेपर्यंत पार्किंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय 1 जूनपासून लागू करण्यात आला आहे.
दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट आणि कफ परेड परिसरातील हॉर्निमन सर्कल, जमनालाल बजाज मार्ग, दोराबजी टाटा रोड, इरॉस सिनेमासमोरील ट्रॅफिक आयलंड, वालचंद हिराचंद मार्ग, रामजीभाई कामानी मार्ग (पश्चिम बाजू), करिंबोय मार्ग, बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, मुद्रणा शेट्टी लेन, चिंचोळी लेन, व्ही. एन. रोड, होमजी स्ट्रीट आणि नागीनदास मास्टर लेन या ठिकाणी आता मोफत पार्किंग करता येणार आहे. या मोफत पार्किंग सुविधेमुळे स्थानिक रहिवाशांसह वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.