Four accused in Ghatkopar hoarding incident case remanded in judicial custody
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी चार आरोपींना न्यायालयीन कोठडी Pudhari Photo
मुंबई

Ghatkopar hoarding collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आरोपपत्र सादर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चारही आरोपीविरुद्ध विशेष तपास पथकाने शुक्रवारी (दि.12) स्थानिक न्यायालयात ३२९९ पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. त्यात 102 साक्षीदार असून त्यांची जबानी आरोपपत्रात सादर करण्यात आले आहे. तसेच आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. या चार आरोपींमध्ये भावेश प्रभूदास भिडे, मनोज रामकृष्ण संगू, सागर कुंडलिक कुंभारे, जान्हवी नयन मराठे ऊर्फ जान्हवी केतन सोनलकर यांचा समावेश आहे.

60 दिवसांत आरोपपत्र सादर करणे पोलिसांना बंधनकारक होते, मात्र विशेष तपास पथकाने 57 व्या दिवशी आरोपपत्र सादर केले आहे. मे महिन्यांत घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सतराजणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती येताच पोलिसांनी कंपनीचा इगो कंपनीचा मुख्य संचालक भावेश भिंडे याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत इतर आरोपींची नावे समोर आले होते. त्यानंतर होर्डिंगला फिटनेस प्रमाणपत्र देणार्‍या मनोज संधूला पोलिसांनी अटक केली होती.

जून महिन्यात कंपनीची माजी संचालिका जान्हवी मराठे आणि कॉन्ट्रक्टर सागर कुंभारे यांना गोव्यातील एका हॉटेलमधून पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनीही विशेष सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केा होता. मात्र अटकपूर्व जामिन अर्ज फेटाल्यानंतर जान्हवी आणि सागर हे दोघेही पळून गेले होते. अखेर या दोघांनाही ८ जूनला गोवा येथून अटक करण्यात आली. सध्या चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्याने विशेष पथकाने ५७ व्या दिवशीच चारही आरोपींविरुद्ध ३२९९ पानांचे आरोपपत्र स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आले. या चारही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपपत्रात १०२ साक्षीदाराची जबानी नोंदविण्यात आली असून ही जबानी आरोपपत्रासोबत सादर करण्यात आली आहे. त्यात महानगरपालिकेचे दोन कर्मचारी, रेल्वेचे सहा अधिकारी आणि कर्मचारी, पाच मेसन आणि आरएमसी पुरवठादार आणि ९० जखमीसह मृतांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. आरोपपत्रात पोलिसांनी व्हीजेटीआयचा अहवाल जोडला आहे. गुन्ह्यांचा तपास किचकट असल्याने तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास पुढे चालू राहणार असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

SCROLL FOR NEXT