Ines Faria Mumbai Viral Video Pudhari
मुंबई

Ines Faria Mumbai Video: 'मॅम, एक सेल्फी फक्त…’ मुंबईत आलेल्या विदेशी इन्फ्लुएन्सर तरुणीचा फोटोसाठी पाठलाग; व्हिडिओ व्हायरल

Ines Faria Influencer in India: इनस फारिया ही इन्फ्लुएन्सर सध्या भारत भ्रमंतीवर आहे. बुधवारी मुंबईतील रस्त्यावर फेरफटका मारत असताना तिला कटू अनुभवाचा सामना करावा.

पुढारी डिजिटल टीम

foreign travel vlogger Ines Faria Harassed in Mumbai video

मुंबई : महिलांसाठी सुरक्षित शहर असे बिरुद मिरवणाऱ्या मुंबईत विदेशातून आलेल्या इन्फ्लुएन्सर तरुणीला संतापजनक प्रसंगाचा सामना करावा लागला. दोन हिंदी भाषिक तरुण या तरुणीचा फोटोसाठी पाठलाग करत होते, तरुणीने वारंवार नकार दिल्यावर फोटोसाठी तगादा लावला, शेवटी त्या तरुणीने धक्का देताच तरुणाने तिथून पळ काढला. ही सर्व घटना तरुणीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

इनस फारिया ही इन्फ्लुएन्सर सध्या भारत भ्रमंतीवर आहे. बुधवारी मुंबईतील रस्त्यावर फेरफटका मारत असताना तिला कटू अनुभवाचा सामना करावा. इनस तिच्या पोस्ट म्हणते, 'माझ्यासोबत भारतात पहिल्यांदाच अशी घटना घडली. मी दोन महिने झाले भारतात आहे. बहुतांशी वेळा मला खूपच चांगला अनुभव आला. पण हा दिवस वेगळा ठरला. ते माझा पाठलाग करत होते, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आग्रह करत होते. पण मला त्यांच्यासोबत सेल्फी काढायची नव्हती. मला ते खूप अस्वस्थ करणारं होतं. ते माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. 15 मिनिटे ते माझा पाठलाग करत होते. शेवटी मी त्यातल्या एकाला धक्का दिला आणि मग ते निघून गेले. 'नो' हा एक शब्द नसून ते एक पूर्ण वाक्य आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. तुमची सुरक्षा महत्त्वाची असते.’

व्हिडिओत काय दिसते?

एक तरुण इनसचा पाठलाग करत म्हणतोय, मॅडम प्लीज एक सेल्फी, एक सेल्फी. यावर इनस त्याला नकार देतेय. तरीही त्याचा सेल्फीचा आग्रह सुरू होताच. शेवटी तिने धक्का दिला आणि पुढे निघून गेली.

मुंबई पोलिसांनी घेतली दखल

इनसने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करताच मुंबईकरांनी कमेंट्समध्ये माफी मागितली. तुला मुंबईत असा अनुभव आला, आम्ही माफी मागतो, अशा प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिल्या. तर मुंबई पोलिसांनीही इनसशी संपर्क साधला आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहे इनस फराह?

इनस ही पोर्तुगीज भाषा बोलते. तिच्या युट्यूबवरील बायोमध्ये तिने लिहिलंय की, मी नोकरी सोडली, पैसे कमावण्याचा प्लान बी माझ्याकडे नव्हता. मी आता जगभ्रमंतीवर निघाली आहे. इनस ही गेल्या दोन महिन्यापासून भारतातील विविध शहरांमध्ये फिरतेय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT