मुंबईतील लालबागच्या राजाचे आगमन लवकरच होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु आहे. भव्य मंडप गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. पहिल्याच झलकने भक्त भारावले आहेत
मुंबईत लालबागच्या राजा मंडप परिसर विद्युत रोषणाईने उजळला आहे. विविध रंगाच्या लायटिंगने मंडप सजवण्यात आलाय.
याठिकाणी विद्युत रोषणाई पाहायला लोक गर्दी करत आहेत. विविध फुले आणि लायटिंगची सजावट डोळे दिपवून टाकणारी आहे
गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. दरम्यान, लालबागच्या राजाच्या सजावटीची चर्चा होऊ लागली आहे
भव्य दिव्य सजवलेला मंडप आणि विद्युत रोषणाई भक्तांना आकर्षित करत असून लालबागच्या राजाच्या सुंदर मंडपाची झलक पाहायला विसरु नका