पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ६५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Election| Kedar Dighe)
यामध्ये वरळीतून अदित्य ठाकरे , कोपरी- पाचपाखाडीतून केदार दिघे, गुहागरमधून भास्कर जाधव , शाहुवाडीतून सत्यजीत पाटील, सावंतवाडीतून राजन तेली, ठाण्यातून राजन विचारे, रत्नागिरीतून सुरेंद्रनाथ माने, राधानगरीतून के. पी. पाटील, दिंडोशीमधून सुनिल प्रभु यांच्यासह ६५ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Election| Kedar Dighe)