मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जुहू येथील पुष्पा नरसी पार्कजवळ अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. एकाच मोटारसायकलवरून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी गाडीवर पाच राऊंड गोळ्या झाडल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, टायगर सुरक्षित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून त्याचा चालक फिरदौस आणि उमेश चौहान नामक एका रिक्षाचालकाला मात्र, गोळीबारात दुखापत झाली. दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एका संशयिताला सांताक्रूझ परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सलमानसोबत काम करणारे लक्ष्य
या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित अनिल पंडित नावाच्या व्यक्तीने घेतल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. या ऑडिओ क्लिपमधून सलमान खानसोबत काम करणाऱ्या चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. मात्र, या संदेशाची सत्यता आणि हल्लेखोरांचा टोळीशी असलेला संबंध
पोलिसांकडून स्वतंत्रपणे पडताळला
मुंबई: जुहू येथील मैदानातून फुटबॉल सामना खेळून टायगर श्रॉफ बाहेर पडत असताना टायगरच्या गाडीवर तिघांनी गोळीबार केला. यातील एका हल्लेखोराने गाडीचे दार उघडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. या गर्दीतून किंवा गर्दीच्या दिशेने हल्लेखोरांनी तीन ते चार गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे.
पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी टायगर श्रॉफला गोळी लागलेली नसून तो सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. जुहू पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला असल्याचे सांगितले. या गोळीबारामागील नेमका हेतू, हल्लेखोरांची ओळख आणि कथित टोळीचा सहभाग याबाबत तपास सुरू आहे. सोशल मीडियावरील धमकीच्या संदेशाची सत्यता तपासल्यानंतरच त्याचा या हल्ल्याशी असलेला संबंध स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील संदेशात नेमके काय?
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल पंडित नावाने बोलणाऱ्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या वतीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला. टायगर श्रॉफला यापूर्वी इशारा दिला होता; मात्र त्याने तो गांभीर्याने घेतला नाही, असा दावा या संदेशात करण्यात आला. सलमान खानसोबत काम करणाऱ्या चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना लक्ष्य करण्याची धमकीही या क्लिपमध्ये देण्यात आली. सलमान खानने लॉरेन्स बिश्नोई आणि बिश्नोई समाजाची माफी मागावी, अन्यथा त्याच्या कुटुंबालाही लक्ष्य केले जाईल, अशी धमकी दिली आहे.
आरोपींच्या शोधासाठी आठ पथके रवाना
या गोळीबारप्रकरणी जुहू पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून वेगवान तपासाच्या सूचना
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांकडून घटनेचा सविस्तर आढावा घेतला. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे आणि तपासाला वेग देण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी टायगर श्रॉफ याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून त्याची विचारपूस केली आणि हल्लेखोरांना लवकरच पकडू, असे आश्वस्त केले.
'सेलिब्रिटी असो वा सामान्य, सुरक्षेशी तडजोड नाही' मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस येऊ देणार नाही, असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दिला. सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाची सुरक्षा ही सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे, असे सांगत मुंबईत दादागिरी, दहशत किंवा कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. आपण मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून, गोळीबार करणाऱ्यांना लवकरात लवकर शोधून काढले जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान रात्री उशिरा मुंबईत आल्यानंतर शिंदे यांनी टायगर श्रॉफ याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी जॅकी श्रॉफ यांना फोन केला होता. हल्ल्यामागील हेतूचा तपास गोळीबारानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण, संशयितांची हालचाल आणि उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.