Licenses of six eateries including Chaayos suspended 
मुंबई

Mumbai Licenses of six eateries including Chaayos suspended | अन्नदाता कॅफे, चायोससह सहा आस्थापनांचे परवाने निलंबित

Licenses of six eateries including Chaayos suspended - हॉटेल, उपाहारगृहांवर एफडीएचा बडगा; झुरळे, माश्या, अस्वच्छतेच्या तक्रारींची गंभीर दखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील हॉटेल आणि उपाहारगृहांमधील अन्नपदार्थांच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अन्नपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता, स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि अन्न सुरक्षा निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने १९ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ६ आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. वांद्रे, सांताक्रूझ, कुलाबा, चर्चगेट आणि फोर्ट परिसरातील या आस्थापनांमध्ये ५ स्पाइस, क्यूआयएन, ईव्हीई आणि चायोस, अन्नदाता कॅफ यांसारख्या हॉटेल व उपाहारगृहांचा समावेश आहे.

वांद्रे पश्चिम येथील ५ स्पाइस आणि क्यूआयएन चालविणाऱ्या सानिजा हॉटेल्स प्रा. लि., सांताक्रूझ पश्चिम येथील ईव्हीई चालविणाऱ्या मोनार्क लिबर्टी वर्ल्ड वाइड हॉस्पिटॅलिटी एलएलपी या आस्थापनांवर कारवाई झाली. कुलाबा येथील ड्रोगेरिया सेलर्स प्रा. लि. आणि अन्नदाता कॅफे, चर्चगेट येथील चायोस तसेच फोर्ट परिसरातील ब्लॅिक कॉमर्स प्रा. लि. यांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. विविध अन्न आस्थापनांच्या तपासणीदरम्यान गंभीर स्वरूपाच्या स्वच्छताविषयक त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक ठिकाणी जिवंत झुरळे आणि माश्या आढळल्या. चहा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे गंजलेली आणि अस्वच्छ होती.

अन्नपदार्थ तयार करण्याच्या जागेजवळ ओला आणि सुका कचरा वेगळा न करता ठेवण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील इतर भागांतही अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. काही ठिकाणी कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

अन्न व्यवसाय चालविताना परिसराची स्वच्छता, अन्नपदार्थांची योग्य साठवणूक, कामगारांचे आरोग्य आणि अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची स्वच्छता राखणे बंधनकारक आहे. मात्र, तपासणीत या मूलभूत नियमांकडेच दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले. त्यामुळे केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट परवाने निलंबित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

२ कोटी ६ लाखांचा अन्नसाठा जप्त

दरम्यान, राज्यातील इतर भागांतही अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. भिवंडी येथे आयात अन्नपदार्थावरील मूळ उत्पादन दिनांक, मुदत दिनांक आणि कमाल किरकोळ किंमत रासायनिक द्रव्याने खोडून त्यावर नव्याने छपाई केली जात असल्याचा प्रकार उघड झाला. या कारवाईत २ कोटी ६ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT