मुंबई

Land Measurement New Rule : कौटुंबिक वाटणीची जमीन मोजणी २०० रुपयांत! मोजणीसाठी ९० आणि ३० दिवसांचा फॉर्म्युला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कुटुंबातच झालेल्या वाटणीची जमीन मोजणी आता २०० रुपयांत होईल; तर नियमित मोजणी ९० दिवसांत आणि द्रुतगती मोजणी ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे मोजणी प्रक्रियेतील उशीर आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. या निर्णयानुसार ग्रामीण भागात २ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी २ हजार रुपये, तर शहरी भागात १ हेक्टरपर्यंत ३ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

कौटुंबिक वाटणी मोजणी

कोर्ट वाटप किंवा संमतीने होणाऱ्या मोजणीसाठी प्रति पोटहिस्सा २०० रुपये शुल्क.

ग्रामीण मोजणी दर

दोन हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी २ हजार रुपये, तर द्रुतगतीसाठी ८ हजार रुपये शुल्क.

शहरी मोजणी दर

एक हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी ३ हजार रुपये, तर द्रुतगतीसाठी १२ हजार रुपये शुल्क.

पुनर्भेट शुल्क झटका

अर्जदार मोजणीच्या दिवशी गैरहजर राहिल्यास मूळ फीच्या ५० टक्के किंवा कमाल १० हजार रुपये दंड.

भूमापकला गैरहजेरीची सवलत

मोजणीच्या दिवशी अधिकारी अनुपस्थित राहिल्यास अर्जदाराला कोणतेही पुनर्भेट शुल्क नाही.

गुंठेवारी मोजणी

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत येणाऱ्या भूखंडांच्या मोजणीसाठी दीडपट शुल्क.

उच्चतपासणी फी

कनिष्ठ भूमापकाच्या मोजणीवर आक्षेप असल्यास तपासणीसाठी ३ ते ५ पट अधिक शुल्क.

सरकारी संस्थांना सवलत

निमशासकीय संस्थांना मोजणी दरात ५० टक्के तर पूर्णतः शासकीय जमिनींना ७५ टक्के सवलत मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT