Vikhroli fake currency racket | विक्रोळीत नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश Pudhari File Photo
मुंबई

Vikhroli fake currency racket | विक्रोळीत नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

तब्बल 6 लाख 35 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: खर्‍या चलनी नोटांच्या बदल्यात तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून प्रत्यक्षात बनावट देवून फसवणूक करणार्‍या चार जणांच्या टोळीला कक्ष 6, गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रोळी पूर्व येथून रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 6 लाख 35 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद मोसिन अबु बिलाल चौधरी उर्फ चौधरी (34), मोहम्मद नफीज अब्दुल रौफ खान उर्फ जावेद (37), सईद तबारक हुसेन सिद्दीकी उर्फ सईद बंटाय (50) आणि मंजर इबने इस्माईल सोंडे (60) यांचा समावेश आहे. विक्रोळी बस डेपो समोरील रस्त्यावर एक इसम 1 लाख रुपयांच्या बदल्यात 3 लाख रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा देणार असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांना समजले होते.

त्यानुसार सापळा रचत आरोपींची झडती घेतली असता 100 रुपयांच्या भारतीय बच्चो का बँक असे लिहिलेल्या 200 बनावट नोटा, गुन्ह्यात वापरलेली चक 06 उङ 7995 क्रमांकाची वॅगन ठ कार (किंमत 5 लाख), 6 मोबाईल संच (किंमत 85 हजार) आणि रोकड 50 हजार 550 रुपये असा एकूण 6 लाख 35 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद नफीज उर्फ जावेद याच्यावर पनवेल पोलीस ठाण्यात 2012 मध्ये फसवणुकीचा गुन्हा, सईद सिद्दीकी याच्यावर दिंडोशी पोलीस ठाण्यात 2019 मध्ये फसवणुकीचा गुन्हा, तर मंजर सोंडे याच्यावर रायगड जिल्ह्यात 2015 मध्ये दरोडा व धमकीचे गुन्हे नोंद आहेत. तसेच इघउ पोलीस ठाण्यातील दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्येही ही टोळी वॉण्टेड होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT