मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणारे स्मारक पुढच्या वर्षी 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.
6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा आपला मानस आहे. स्मारकामध्ये 450 फूट उंचीचा त्यांचा पुतळा असेल. सध्या आंबेडकर स्मारकाचे काम 50 टक्के पूर्ण झाले असून पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे.