Electric Shock Pudhari
मुंबई

Electric Shock | मुंबईत गणेश मंडपाजवळ विजेचा धक्का; दोघांचा मृत्यू

आठ वर्षीय मुलगी, ३३ वर्षीय महिलेचा बळी; चौघे जखमी : स्टॉलचालकावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : लालबाग परिसरातील काळाचौकी येथील गणेशोत्सवाच्या गर्दीत तात्पुरत्या शीतपेय व पाणी स्टॉलजवळ विजेचा धक्का लागून आठ वर्षांच्या मुलीसह ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत अन्य चौघे जखमी झाले. त्यापैकी १२ वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी स्टॉलचालक कमल शेट्टी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेश मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ तात्पुरता पाणी व शीतपेय विक्रीचा स्टॉल उभारण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास स्टॉलजवळ अचानक विद्युत प्रवाह पसरला. त्याच्या संपर्कात आल्याने सहा जणांना विजेचा धक्का बसला. घटनेनंतर उपस्थितांनी तातडीने वीजपुरवठा बंद केला.

दोघांचा मृत्यू

या दुर्घटनेत रागिणी घनश्याम यादव (८) आणि सुजाता (३३) यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये किरण अकबर नाईक (१९), तन्वी नरेश हांडे (१९), साहिल संदीप तरे (१९) आणि रुही सिंग (१२) यांचा समावेश आहे. किरण, तन्वी आणि साहिल यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुहीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT