यंदा करेक्ट कार्यक्रम, जिंकून कसा येतो तेच बघतो, मला उमेदवारी पक्की..., लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आम्हालाच... गुलाल तयार ठेवा... या आणि अशा आशयाच्या पोस्टमुळे विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच सोशल मीडियावर धूमशान सुरू आहे. फेसबुक, व्हॉटस् अॅप, इन्स्टाग्राम व इतर प्लॅटफॉर्मवर प्रचारच्या पोस्ट, रिल्सचा पाऊस आणि त्यावर कमेंटचे धबधबे कोसळत आहेत.
विधानसभा निवडणुकीचे यंदाचे चित्र विलक्षण आहे. गतवेळी भाजपसोबत असणारे उद्धव ठाकरे यंदा आघाडीत तर आघाडीत असणारे अजित पवार महायुतीत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाकर्मीना पोस्ट करण्यासाठी चांगलेच कोलीत मिळाले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर इलेक्शन फिव्हर वाढत चालला आहे. पक्ष, उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होत आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थकही सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टिव्ह झाले आहेत. पक्ष, उमेदवारांची सोशल मीडिया फौज !
जवळपास सर्वच पक्ष आणि उमेदवारांची सोशल मीडियाची फौज सध्या कार्यरत आहे. दिवसरात्र पोस्टचा मारा सुरू आहे. विकासकामांचे दाखले देताना आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही पोस्टच्या माध्यमातून झडत आहेत. त्याचबरोबर पक्ष-उमेदवारांचे समर्थकही सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. गत निवडणुकीत त्यांची विरोधातील वक्तव्ये, टीका व आता त्यांच्याकडूनच सुरू असलेल्या समर्थनाच्या वक्तव्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. पक्षाचे हँडल्स मोडवर सर्वच पक्षाचे सोशल मीडिया आहेत. महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोशल मीडिया हँडल्सवर सरकारच्या योजनांचा लेखाजोखा मांडला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दररोज होणाऱ्या कार्यक्रमांचा प्रचार केला जात कामावर टीका करणाऱ्या पोस्न ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवा काँग्रेसकडून केला जात आहे
सोशल मीडियातून मतदा भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुतीतील सर्वच नेत्यांचे भावनिक साद घालणारे व्हिडीओ सध्या जोरदार फिरत आहेत. लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि महिलांच्या प्रतिक्रियांचा यामध्ये समावेश आहे.
उमेदवार अथवा पक्षाच्या समर्थकांकडून व्हॉटस अॅप ग्रुपवर समर्थन अथवा विरोधाच्या पोस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. याबाबत अन ठिकाणी पोलिसांमध्ये तक्रारी होत आहेत. मि परिवाराच्या ग्रुपमध्ये होणारा राजकीय संवाद वादाचे प्रसंग ग्रुप अॅडमिन आणि पोलिसांची डोकेदुखी बनत आहेत.