नवी दिल्लीः भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज सांयकाळी पत्रकार परिषद घेऊन पश्चीम बंगाल, आसाम या तामिळनाडू व केरळ या राज्यांतील निवडणूकीची घोषणा आज त्यांनी केली. याबरोबरच महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटका, नागालँड, त्रिपूरा, या राज्यांतील पोटनिवडणूकांची देखील घोषणा करण्यात आली.
यापैकी गोवा, कर्नाटक, नागलँड, व त्रिपूरा या राज्यातील पोटनिवडणूकीसाठी 9 एप्रिलला मदतान होईल तर महाराष्ट्र व गुजरातमधील पोटनिवडणूकीसाठी 23 एप्रिलला मतदान हाईल
अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक
महाराष्ट्रातील बारामती व राहुरी या दोन मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार याचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती विधानसभेची जागा रिक्त आहे. तसचे नगर मधील राहूरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कार्डिले यांचे निधन झाल्याने तिही जागा रिक्त आहे. या दोन जागांवरील पोटनिवडणूकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होईल व 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
शिवाजी राव कार्डीले यांच्या निधनाने राहूरीची जाग रिक्त
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे ६ वेळा आमदार राहिलेले दिग्गज नेते शिवाजीराव कार्डिले (वय ६७) यांचे ऑक्टोबर २०२५ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते. यामुळे ही जाग रिक्त झाली होती आता या जागेसाठी पोट- निवडणूक होणार आहे.