High Court
मुंबई : म्हातारपणात सांभाळ न करणाऱ्या मुलाला आणि नातवाला आजोबांनी चांगलाच दणका दिला आहे. मुंबईतील 88 वर्षांचे स्वरूप दास यांच्या या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या आणि नातवाच्या नावे केलंल बक्षीस पत्र रद्द करण्याचा महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
स्वरूप दास यांनी बक्षीस पत्र करून आपला फ्लॅट मुलाच्या आणि नातवाच्या नावे केलेला होता. हा फ्लॅट परळमधील उच्चभ्रू सोसायटीत होता. स्वरूप दास यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर आणि बक्षीस पत्र दिल्यानंतर काही दिवसांनी मुलगा आणि नातवानं त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. याशिवाय, ते त्यांच्या पालन पोषणाकडे दुर्लक्ष करू लागले आणि त्यांना एका खोलीत डांबून ठेवू लागले. या दुर्लक्षामुळे, स्वरूप दास यांनी न्यायालयात धाव घेतली.