Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  file photo
मुंबई

सत्तेचा फॉर्म्युला आज ठरणार; एकनाथ शिंदे राजीनामा देणार

Maharashtra Assembly Election Result 2024 | सत्तेचा फॉर्म्युला आज ठरणार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी राज्य विधानसभेची मुदत संपते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या पदाचा आणि ओघानेच सरकारचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर करावा लागेल. त्याचवेळी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपाल शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहण्यास सांगू शकतात. राजभवनावरील ही औपचारिकता मंगळवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होऊ शकते.

सत्तेचा फॉर्म्युला आज ठरणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी मुंबईत येत असून, तिन्ही पक्षांच्या बैठकीनंतर सायंकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होऊ शकते. अमित शहा, राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त बैठक होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हटून बसले असून, प्रदेश भारतीय जनता पक्षही आपला दावा मागे घेण्यास तयार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आतापर्यंत फोनवरच चर्चा सुरू असून, आता मंगळवारी मुंबईतच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

फडणवीस चर्चेविनाच दिल्लीहून परतले

अमित शहा मुंबईत येत असल्याने शिंदे यांनी आपल्या सर्व भेटी व कार्यक्रम रद्द केले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी दिल्लीला जाणेही टाळले. दरम्यान, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री फडणवीस अमित शहा यांच्याशी चर्चा न करताच मुंबईला परतले असल्याचे सोमवारी रात्री सांगण्यात आले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार फडणवीस रात्री उशिरा अमित शहा यांच्याशी चर्चा करणार होते. मात्र, अचानक त्यात बदल झाला. स्वतः अमित शहा यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.