महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना ऊत आला होता. आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत माहिती देत या सर्व चर्चा शांत करण्याचा प्रयत्न केला.
शिंदेंनी दिल्लीत अधिवेशन सुरू आहे. दर अधिवेसनात आपल्या खासदारांना आणि मंत्र्यांना भेटतो. दिल्ली दौऱ्यात मोदींची देखील भेट घेतली. महाराष्ट्रातील विषयांवर चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली असं सांगितलं.
दिल्ली दौऱ्यावरून टीकेबाबत बोलताना शिंदे म्हणाले की कोण टीका करतो कोण काय बोलतो यापेक्षा मला जे काही करायचं असतं ते मी करतो.
शिंदेंनी मोदींसोबत इराण युद्धाबाबत देखील चर्चा केली असे सांगत या काळात देशातील सर्वांनी एकसंघ रहायला हवं असं सांगितलं. एनडीए पूर्णपणे मोदीजींच्या आणि देशाच्या पाठीशी उभा आहे. दुबई, मस्कटमध्ये लोक अडकले आहेत. त्यांना आणायचे काम केले.
मोदींबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, त्यांचे इतर देशांशी चांगले संबंध आहेत. कोव्हिडपासून मदत केली आहे. मोदींमुळेच तेलाचे दोन जहात आले आहेत.
शिंदेंनी विकास हा मोदीजींचा अजेंडा आहे. येत्या निवडणुकीत एनडीएल चांगले यश मिळेल.