मुंबई

Eknath Shinde: ‘गड्या आपला गाव बरा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले ‘दरे’ गावात

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या दीड महिन्यांहून अधिककाळ राजकीय मंडळी लोकसभा निवडणूक प्रचारात दंग आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील महायुतीच्या प्रचारात गुंतले होते. दरम्यान लोकसभा निवडणुक प्रचार आणि धावपळीच्या व्यस्त वेळापत्रकातून मुख्यमंत्री शिंदेना आज (दि.३० मे) त्यांच्या 'दरे' या गावाला भेट दिली. हा व्हिडिओ त्यांनी एक्स पोस्ट करत शेअर केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की,
परदेशी कशाला जायाचं
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी…

लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी त्यांनी शेतात फेरफटका मारला. शेती आणि मातीची पाहणी केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ सोबत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Eknath Shinde: इथली माती मनाला शांती देते-मुख्यमंत्री शिंदे

इथली माती माझ्या मनाला शांती देते आणि पुन्हा एकदा जोमाने नवीन आव्हाने सर करण्याचे बळ देत असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT