मुंबईः जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे, उभे असतात त्यामुळे सध्या महाराष्ट्रात जे पावसाचे संकट आले आहे त्यामुळे यावेळी हा मेळावा साध्या पद्धतीने घेत आहेत. ‘मी वर्क फॉर्म करणारा किंवा व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौऱ्यावर जाणारा कार्यकर्ता नाही’ असे असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टिका केली. पुढे ते म्हणाले या मेळाव्यासाठी मोजक्याच लोकांना बोलवले आहे बाकीचे सर्व लोक तिकडे मदत करत आहेत. शिवसैनिकांनी पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले. नेस्को सेंटर येथे शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणार
दुष्काळ, किंवा पूर परिस्थितीत आमचे सरकार कायमच शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले आहे. आता जे आस्मानी संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे त्यामुळे आम्ही तुमच्या पाठिशी राहू असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मी स्वतः शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आहे त्यांच्या पाठिशी मी खंबीरपणे उभे राहणार आहे असे आश्वासनही दिले.
आम्ही देणारे आहोत
सर्व निकष बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना मदत करणार आहे. आमचे हात कधीही रिकामे नसतात. मदत करणारे च असतात. आमची देना बँक आहे लेना बँक नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. आता आलेल्या शेतकऱ्यांवर जे संकट आले आहे. त्यांना तात्काळ मदत करणार आहे अशी ग्वाही दिली.
मोदींजीनी पाकिस्तानला धडा शिकवला
ऑपरेशन सिंदूर अभी जारी आहे. असे म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकवला, आम्ही त्यांचा जयजयकार करणारच, असे सांगत गिधाड खाल पहनके कोई शेर नही होता. अशी टिका करत त्यांनी मोदींचा अभिमान आहे असे सांगितले.
तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानात करायला पाहिजे
काही लोकांनी आम्ही आमचा मेळावा सुरतलो घ्यावा असा सल्ला दिला. अमित शाह यांना अध्यक्ष करा असे काहींचे म्हणाले. यावर बोलताना शिंदे म्हणाले की सुरत हे भारतातच आहे. त्यामुळे आम्ही तिथे मेळावा घेतला तरी काहीही हरकत नाही पण तुम्ही पाकिस्तानात मेळावा घ्या व असर मुनीरला अध्यक्ष करा. कारण तुम्ही भारतीय लष्करावर संशय घेऊन पाकिस्तानची तळी उचलली आहेत. परदेशी मिडीयाचा चुकीची माहिती देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसतात. अशी टिका त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर केली.
आम्ही दिल्लीला मुजरे करायला जात नाही
तुम्ही १० जनपथ येथे मुजरे करायला जाता पण आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसे आणण्यासाठी मुंबईला जातो. तसेच मोदीजींनी अयोध्या येथे मंदिर बांधण्याचे काम केले. हे खरे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते ते मोदींजींनी पूर्ण केले त्यामुळे मोंदीजींच्यावर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला नाही नाही. तुम्ही संघावर टिका करता पण ज्याठिकाणी संकट, आपत्ती येते तिथे संघाचे लोक अगोदर पोहचतात. त्यामुळे संघाची वाटचाल ही देदिप्यमान आहे. त्या संघाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांच्यावर तुम्ही टिका करता तुम्ही हिंदूत्व सोडले आहे पण आम्ही नाही त्यामुळे आमची शिवसेनादेखील ज्वलंत हिंदूत्ववादी पक्ष आहे. असे त्यांनी ठामपणे सांगितले.
आगामी निवडणूकीत महायुतीचीच सत्ता येणार
आगामी मुंबई महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईत जर त्यांची सत्ता आली तर मुंबई २५ वर्षे मागे जाईल अशी टिकाही केली. त्यामुळे आगामी सर्व निवडणूंकात महायुतीची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा तसेच. महायुतीच सर्व ठिकाणी जिंकणार असल्याचा विश्वासही बोलून दाखवला.
पुरग्रस्तांना मदत करा
तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करायचे आहे. मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम करायचो आताही मी एक शिवसेनेचा कार्यकर्ताच आहे आणि आता तुम्ही एकनाथ शिंदे म्हणून काम करायचे आहे. आम्ही केलेले काम जनतेपर्यंत पोहचवायचे आहे. असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पुरग्रस्तांना मदत करा शेतकरी संकटात आहे शिवसैनिकाचे प्रथम कर्तव्य हे संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हे आहे. तुम्ही शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.