मुंबई : बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत दोन संचालक निवडून आल्यानंतर आता शेकडो कामगारांनी सोमवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला. एवढेच नाही तर राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सदस्यत्वही स्वीकारले. यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे बेस्ट युनिट अध्यक्ष किसन वाळुंज सरचिटणीस किरण साळुंखे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कुलाबा, घाटकोपर, आणि मजास या आगारातील सभासद पदाधिकार्यांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला.
बेस्ट क्रेडिट सोसायटीमध्ये ठाकरे गटाला एकही जागा जिंकता आली नाही. याचाच फायदा उठवण्यासाठी शिवसेना शिंदे गट सक्रिय झाला असून, शिवसेना सचिव प्रवक्ते राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक बेस्टमधील कामगारांना शिवसेना शिंदे गटात आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
बेस्टमधील शिवसेना शिंदे गटाची ताकद दाखवण्यासाठी लवकरच बेस्ट कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून या मेळाव्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.