Rohini Khadse Rohini Khadse
मुंबई

Rohini Khadse : पुण्यातील रेव्ह पार्टीत पतीला अटक; रोहिणी खडसे काय म्हणाल्या?

Pune rave party : एकनाथ खडसे यांचे जावई तसेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे येथील रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मोहन कारंडे

Rohini Khadse Pune rave party

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई तसेच याच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे येथील रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. "कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल," अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली आहे.

पुण्यातील खराडी परिसरातील नामांकित हॉटेल स्टेबर्ड अझुर सुट या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सातजणांना अटक करण्यात आली. खेवलकर यांचा व्यवसाय जमीन खरेदी-विक्रीचा असून ते प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांचा राजकीय कुटुंबाशी संबंध आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील स्टेबर्ड अझुर सुट हॉटेलमध्ये प्रांजल खेवलकर यांच्या नावावर दोन रूम बुक करण्यात आल्या होत्या. एका रूमचे २५ ते २८ जुलै तर दुसऱ्या रूमचे २६ ते २७ जुलैपर्यंतचे बुकिंग करण्यात आले होते. प्रत्येक रूमसाठी १० हजार ३५७ रुपये भाडे अदा करण्यात आले होते, अशा पावत्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक राज्याचे जलसंपदा तथा कुंममेळामंत्री गिरीश महाजन यांनी, रेव्ह पार्टीत खडसे यांच्या जावईचा केवळ समावेश नव्हता तर, ते आयोजकच असल्याचा आरोप करत खडसे यांना कोंडीत पकडले आहे. दरम्यान, आज रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी "कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल," असे म्हटले आहे.

भाष्य करणे योग्य ठरणार नाही : एकनाथ खडसे

पोलिस तपासातून खरे काय ते बाहेर येईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे किंवा भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी रविवारी व्यक्त केली आहे. पुण्यातील ही पार्टी रेव्ह होती की घरगुती स्वरूपाची, हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होईल. या पार्टीदरम्यान खरोखर अमली पदार्थाचा वापर झाला होता की नाही, याची खात्री न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच होईल, त्यामुळे तोपर्यंत कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT