मुंबई

Eknath Shinde Mobile : लंडनहून परतताना एकनाथ शिंदे विमानातच विसरले मोबाईल; पहाटे यंत्रणांची उडाली एकच धावपळ!

घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर....

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडन दौऱ्यावरून ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने रविवारी पहाटे मुंबईत परतले. मात्र विमानतळावरून घरी पोहोचल्यानंतर आपला मोबाईल फोन विमानातच राहिला असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर तो मिळविण्यासाठी यंत्रणांची एकच धावपळ उडाली.

पोलिसांची एकच विमानतळावरील ब्रिटिश एअरवेजच्या सुरक्षा कार्यालयाशी संपर्क साधला आणि शोधमोहीम राबवली गेली. अखेर पहाटे चार वाजता मोबाईल सापडला आणि शिंदे यांच्याकडे तो पाच वाजता सुपूर्द करण्यात आला.

त्यानंतर शिंदे आणि पोलिस यंत्रणेनेही सुटकेचा निःश्वास टाकला. लंडन दौऱ्यावरून १२ सप्टेंबर रोजी शिंदे मुंबईत परतले. मात्र लंडन ते मुंबई असा प्रवास ज्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून केला, त्या प्रवासादरम्यान शिंदे त्यांचा मोबाईल विमानात विसरले.

घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचा फोन परत मिळवण्यासाठी यंत्रणांची धावाधाव सुरू झाली. लंडनला जाताना त्यांनी स्विझर्लंडमध्ये थांबा घेतला. मात्र पुन्हा मुंबईला येताना सलग नऊ तास परतीचा प्रवास केला.

१२ सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे यांचे विमानाने पहाटे दोन वाजता आगमन झाले. तेव्हा स्वागत स्वीकारण्यात आणि माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात शिंदे गुंग झाले. त्यात त्यांना मोबाईलचा विसर पडला. पण रात्री तीन च्या सुमारास शिंदे जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना त्यांचा मोबाईल फोन विसरल्याचे लक्षात आले.

अशी घटना घडलीच नाही; उपमुख्यमंत्री कार्यालयाचा दावा

त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्रांच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांना याची माहिती देण्यात आली. अखेर पहाटे ४ च्या सुमारास शिंदे यांचा फोन सापडला. मोबाईल मिळेपर्यंत एकनाथ शिंदे निवासस्थानी जागेच होते. मात्र, उपमुख्यमंत्री कार्यालयाने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT