मुंबई 
मुंबई

Mumbai Drunk woman tries entering train motorman cabin|तरुणीचा मद्यधुंद अवस्थेत रेल्वे मोटरमन केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न

रेल्वे मोटरमन केबिनमध्ये घुसण्याचा तरुणीचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : रेल्वे स्थानकावर एका तरुणीने लोकल ट्रेनच्या प्रतिबंधित मोटरमन केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे.

या व्हिडिओमध्ये लाल रंगाचा स्कर्ट आणि हाय हिल्स परिधान केलेली एक तरुणी फलाटावर उभ्या असलेल्या लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनच्या दरवाजाचे हँडल दोन्ही हातांनी घट्ट धरून आत शिरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मोटरमन केबिनचा दरवाजा आतून बंद असल्याने तिला आत प्रवेश करता आला नाही. फलाटावर उपस्थित एका प्रवाशाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

या प्रकरणी आरपीएफने तात्काळ गोरेगाव स्थानक मास्तर, लोहमार्ग पोलीस आणि ड्युटीवरील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. गोरेगाव स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि २ वरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, त्या फुटेजमध्ये अशी कोणतीही घटना अद्याप आढळून आलेली नाही. त्यामुळे हा व्हिडिओ नेमका कधी आणि कोणत्या रेल्वे स्थानकावर चित्रित केला गेला, याचा शोध आता रेल्वे पोलीस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT