Government Pharmacist Jobs Latest News
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) औषध निरीक्षक (अन्न व औषध प्रशासन, गट-ब) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, पात्र उमेदवारांना 3 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे आयोगाने २९ जुलै रोजी प्रसिद्धपत्रकाद्वारे सांगितले होते.
दरम्यान MPSC आयोगाने आज (दि.१४) जाहीर केलेल्या सुधारित पत्रकाद्वारे डी. फार्मसी (D.Pharm) केलेले उमेदवार देखील आता पात्र असणार आहेत. औषध निरीक्षक (Drug Inspector ) पद भरतीच्या परीक्षेसाठी आता D.Pharm केलेले विद्यार्थी देखील पात्र असणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या मागणीनुसार औषध निरीक्षक (अन्न व औषध प्रशासन, गट-ब) या पदासाठी १०९ पदांच्या भरतीसाठी दिनांक १३ जुलै, २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित शैक्षणिक पात्रतेप्रमाणे, राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या पत्रानुसार (AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी) यामध्ये Doctor of Pharmacy किंवा Pharm.D किंवा Pharm. D (Post Baccalaureate), Degree in Pharmacy or Pharmaceutical Science मध्ये ग्राह्य धरण्यात आले आहे. तसेच या अर्जासाठी २९ ऑगस्टपर्यंत मुदवाढ देखील देण्यात आली आहे.
उमेदवाराकडे Pharm. D किंवा Pharmaceutical Sciences मध्ये Degree in Pharmacy (AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठाची) असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 सप्टेंबर 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
फी भरण्याची तारीख: 4 सप्टेंबर 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
या पदांसाठी निवड लेखी परीक्षा आणि इतर आवश्यक प्रक्रियेनुसार केली जाणार आहे.
उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर (mpsconline.gov.in) जाऊन नोंदणी करून ऑनलाईन अर्ज सादर करावा.