dr anand nadkarni passed away pudhari
मुंबई

Dr. Anand Nadkarni Passed Away: हसऱ्या चेहऱ्याने मनावरचा ताण कमी करणारे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची प्राणज्योत मालवली

Anirudha Sankpal

dr anand nadkarni passed away : मुक्तांगणचे विश्वस्त आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांचे निधन झाले. त्यांनी ६८ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर परळ येथील एका रूग्णालयात उपचार सुरू होते आज शुक्रवारी पहाटे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. नाडकर्णी यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी मुंबई विद्यापीठातून मानसोपचार विषयात पुदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. तसेच चे मुक्तांगण डी अॅडिक्शन सेंटरचे संस्थापक आणि आयपीएच (इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) चे देखील ते संस्थापक होते.

तरूणांमध्ये होते प्रसिद्ध

याचबरोबर त्यांनी लेखन क्षेत्रात देखील मोठे योगदान दिलं होतं. डिजीटल मीडियाच्या युगात त्यांनी मानसिक आरोग्य या महत्वाच्या विषयावर अत्यंत हलक्या फुलक्या भाषेत आणि आपल्या हसऱ्या प्रसन्न चेहऱ्याने अनेकांच्या मानावरचा ताण कमी केला होता. ते रील्स आणि शॉर्टच्या जमान्यात देखील प्रसिद्ध होते. अनेक पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांनी तरूणाईपुढे मानसिक आरोग्याचा विषय प्रखरपणे मांडला होता.

आनंद नाडकर्णी हे गेल्या काही काळापासून तब्येत बिघडली होती. मुंबईतील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया देखील झाली होती. मात्र त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज (दि. १५ मे) संपुष्टात आली. नाडकर्णी यांच्या निधनानंतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांचे असे अकाली अन् अचानक जाण्यावर सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT