मुंबई

'५ वर्षांनंतर दिशा सालियनच्या अंत्यविधीचे फोटो समोर, चेहऱ्यावर एकही जखम नाही'

Disha Salian Death Case | '५ वर्षांनंतर दिशा सालियनच्या अंत्यविधी दरम्यानचे फोटो समोर'

पुढारी वृत्तसेवा, स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या अंत्यविधीचे पाच वर्षांनंतर फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे, चेहऱ्यावर एकही जखम दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिशाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले होते. मालाड येथील राहत्या घरातून तिने उडी मारून आयुष्य संपवले होते. पण, दिशाचा मृत्यू उडी मारून नव्हे तर तिची सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी आता केला आहे.

दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करून निघृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश द्या अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरीयो यांच्यासह मुंबई पोलिसांवर या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पाच वर्षांनंतर दिशाच्या वडिलांनी बॉम्बे हाईकोर्टात याचिका दाखल केलीय. सीबीआय तपासाची मागणी आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणू केलीय. दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, पुराव्यांशी छेडछाड करण्यात आलीय.

ही एक दुर्घटना होती, हत्या नाही : संजय राऊत

या प्रकरणावर संजय राऊत म्हणाले, "मी पोलिस तपास पाहिला आहे आणि तो एक अपघात होता, खून नव्हता... तिच्या वडिलांनी घटनेच्या पाच वर्षांनंतर याचिका दाखल केली आहे. संपूर्ण राज्याला या याचिकेमागील राजकारण माहित आहे... हे लोक त्यांनी उपस्थित केलेल्या औरंगजेब मुद्द्यावरून लक्ष हटण्यासाठी दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आणत आहेत. हे घाणेरडे राजकारण आपल्या राज्याचे नाव बदनाम करत आहे.."

आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही - रोहित पवार

दिशा सालियन प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस-एससीपीचे आमदार रोहित पवार म्हणाले, "दिशा सालियनचे वडील न्यायालयात गेले आहेत. त्यांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेतले आहे, पण आम्हाला खात्री आहे की आदित्य ठाकरेंचा याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, पण न्यायालयाला निर्णय घेऊ द्या... जर एखादी व्यक्ती न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे...चार वर्षांपूर्वी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर लगेचच बिहारमध्ये फक्त बिहार निवडणुकीसाठी असे बॅनर लावण्यात आले होते. आता चार वर्षांनंतर, ..हा मुद्दा पुढे नेईल कारण चार महिन्यांनी बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि सहा महिन्यांनी मुंबईत निवडणुका आहेत..."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT