मुंबई

Diesel Price : सीमाभागांतून डिझेल भरल्यास एस.टी.ची आर्थिक बचत

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे राज्याच्या सीमेलगतच्या राज्यांमध्ये आंतरराज्य वाहतूक करणार्‍या एसटींनी डिझेल भरल्यास महामंडळाची मोठी आर्थिक बचत होणार आहे. कारण या भागांमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत 7 ते 9 रुपये 50 पैशांनी डिझेल स्वस्त आहे. यामुळे महामंडळाची महिन्याला 3 ते 4 कोटी रुपयांची बचत होऊ शकते.

वाढत्या किमतीमुळे महामंडळाला एप्रिलअखेर एकूण महसुलाच्या सुमारे 65 टक्के रक्कम डिझेल इंधन खरेदीसाठी खर्च करावी लागणार आहे. यामध्ये बचत करण्यासाठी राज्याच्या सीमेलगत असलेल्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत 7 ते 9.50 रुपये डिझेल स्वस्त आहे. एस.टी. महामंडळाच्या 250 आगारांपैकी सुमारे 100 आगार हे सीमावर्ती भागात असून, या आगारातील अनेक एस.टी.च्या आंतरराज्य फेर्‍या सुरू आहेत.

7 हजार बसेस दररोज धावत असून त्यासाठी दररोज 3,50,000 लिटर डिझेल लागते. यापैकी किमान एक हजार एस.टी. आंतरराज्य फेर्‍या करीत असून, या बसना लागणारे डिझेल जर सीमावर्ती राज्यातून घेतल्यास दररोज सुमारे 10-15 लाख रुपयांची बचत होऊ शकते. अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी एस.टी. महामंडळाने 2014-15 मध्ये केला होता. कोल्हापूर व सिंधुदुर्ग विभागातील अनेक एस.टी. गोवा राज्यातील सीमावर्ती भागातील डिझेल पंपावर डिझेल भरत होत्या. आजही अशा प्रकारच्या प्रयोग राबवला, तर महिन्याला 3-4 कोटी रुपये वाचू शकतात.

इंधनाच्या दरात 22 मार्चपासून सातत्याने वाढ होत आहे. याचा फटका एस.टी.ला देखील सोसावा लागत आहे. अशीच दरवाढ सुरू राहिली तर एसटीला सुमारे 125 कोटी रुपये इंधन खर्चापोटी मोजावे लागणार आहेत. आधीच कोरोना आणि आता गेल्या साडेपाच महिन्यापासून संपामुळे एस.टी.ला 2 हजार कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. 12 हजार कोटींचा संचित तोटा सहन करणार्‍या एस.टी.ची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली असून, वाढत्या इंधन दरवाढीमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.

  • महामंडळाने घाऊक डिझेल खरेदीत झालेली दरवाढ टाळण्यासाठी खासगी किरकोळ विक्री करणार्‍या डिझेल पंपावर डिझेल घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत किरकोळ डिझेल विक्री दरात तब्बल 10 रुपयांची वाढ झाली आहे.
  • सावंतवाडी डेपो ते पणजीदरम्यान एसटीची शटल सेवा चालते. या गाड्यांमध्ये पात्रादेवीच्या पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यात येते. प्रत्येक फेरीला वेगळी एसटी पाठवून या डेपोतील सुमारे 10 बसमध्ये येथून कमी किमतीमध्ये डिझेल भरण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT