Dharavi Private Coaching Class Case Pudhari
मुंबई

Dharavi Private Coaching Class Case: धारावीतील खासगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिक्षकाला अटक व कोठडी

Dharavi teacher arrested:

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: धारावीतील एका खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येणार्‍या अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी क्लासच्या ३३ वर्षांच्या आरोपी शिक्षकाला शाहूनगर पोलिसांनी अटक केली.

तो सध्या पोलीस कोठडीत आहे. सतरा वर्षांची पीडित मुलगी धारावी येथे राहते. नीटची तयारी करण्यासाठी तिने धारावीतील एका खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत पीडित मुलगी क्लासमध्ये असताना आरोपी शिक्षकाने जवळीक साधून तिला लग्नाची मागणी घातली होती.

तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. २१ ऑगस्टला तेच प्रकार घडले. शेवटी तिने सोमवारी २४ ऑगसटला शाहूनगर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT