Dharavi Koliwada husband kills wife file photo
मुंबई

Mumbai News: पत्नी काळी जादू करायची! संशयातून पतीने गळा आवळला; हत्येनंतर मुलाला व्हिडिओ कॉलवर दाखवला आईचा मृतदेह

मुंबईतील धारावी परिसरातील धक्कादायक घटना

पुढारी वृत्तसेवा

Mumbai crime news

धारावी: पत्नीने काळी जादू केल्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील धारावी परिसरात शुक्रवारी घडली. हत्येनंतर पतीने आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्या आईची हत्या केल्याचे सांगत मृतदेह दाखवला. सूरजबेन सोलंकी, असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी पती अमृत सोलंकी (वय ५८) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धारावी कोळीवाड्यातील जांबा पास्कल चाळ येथे सोलंकी कुटुंब राहते. अमृत याचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी आणि मुले आपल्यावर काळी जादू करत असल्याचा त्याला संशय होता. यावरून पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत होता. अखेर शुक्रवारी अमृतने पत्नीचा गळा आवळून आणि बाटलीने वार करून हत्या केली.

अमृतचा मुलगा शिवराम सोलंकी (वय ३३) हा दुपारी मुलुंडमधून धारावी येथील घरी आला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने वडिलांना फोन केला असता अमृत याने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर मुलाला आईचा मृतदेह दाखवला. आईचा मृतदेह पाहून मुलाने आरडाओरडा केला. त्याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून सूरजबेन यांना रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. पोलिसांनी आरोपी अमृत सोलंकी याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT