Devendra Fadnavis pudhari
मुंबई

Devendra Fadnavis: आता शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज नाही; महाराष्ट्रात 7 आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आलीत : देवेंद्र फडणवीस

Anirudha Sankpal

Devendra Fadnavis 7 International Universities in Maharashtra: परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय नागरिकांना आता भारतातच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सात आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आली आहेत अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. नुकतेच युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया मुंबईत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ' UWA ने चीफ मिनिस्टर स्कॉलरशिप जाहीर करून तीन विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. UWA हे जगातील नामांकित विद्यापीठांपैकी एक असल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वर्ल्ड-क्लास एज्युकेशन मिळणार आहे. विद्यार्थ्यांना परदेशात न जाता भारतातच शिक्षणाची संधी मिळाल्याने परकीय चलनाची बचत होण्यास मदत होईल.'

मुख्यमंत्र्यांनी UWA यांनी संशोधनाचे केंद्र बनत असल्याने त्याचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा फायदा होईल अशी आशा व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सुरू असलेल्या करारांना आता मोठे स्वरूप मिळत असून, त्यामुळे मुंबईचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आणखी वाढणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मागील महिन्यात तीन विद्यापीठांचे काम सुरू झाले, त्यानंतर आता UWAचा कॅम्पस सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत महाराष्ट्र सरकारने केलेल्या करारानुसार इतर विद्यापीठांचे कॅम्पसही टप्प्याटप्प्याने तयार होत आहेत. ही सर्व विद्यापीठांची सध्याची कॅम्पसेस तात्पुरत्या स्वरूपाची असतील. या सर्व विद्यापीठांचे मुख्य कॅम्पस नवी मुंबईतील एज्युकेशन सिटीमध्ये उभारले जाणार आहेत. या एज्युकेशन सिटीमध्ये जवळपास 80 हजार ते 1 लाख विद्यार्थी शिक्षण घेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT