मुंबई

फडणवीस-पवार रात्री ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील वातावरण तापले असतानाच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीने राजकीय हलचाली गतिमान झाल्या आहेत.

ओबीसी महासंघाच्या विविध मागण्यांसाठी चंद्रपूर येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळाला भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्यासोबत अजित पवारही होते. गणेशोत्सवादरम्यान अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नव्हते. त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी तसेच ओबीसींना दिलेल्या आश्वासनांची माहिती देण्यासाठी फडणवीसांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र या चर्चेची अधिकृत माहिती मिळाली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT