मुंबई

मुंबई : दिव्यांग असल्याने पिकलबॉल संघटनेच्या अध्यक्षांना विमानप्रवेश नाकारला

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांना दिव्यांग असल्याने व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सने विमानात प्रवेश नाकारल्याचा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला आहे.

बाली (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या जागतिक पिकलबॉल स्पर्धेसाठी प्रभू निघाले होते. त्यांचे व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सचे तिकीट होते. दिव्यांग असल्याकारणाने त्यांच्याबरोबर त्यांचे चार सहाय्यक होते. प्रभू हे सहाय्यकांसह बोर्डिंग पास घेण्यास गेले असता त्यांना पास न देता त्यांच्या चार सहाय्यकांना बोर्डींग पास देण्यात आला. पास का दिला नाही याबाबत प्रभू यांनी विचारणा केली असता, "आमचे लो कॉस्ट एअरलाइन्स असल्याने दिव्यांगांसाठी केबिन चेअर उपलब्ध नाहीत. तसेच, आम्ही दिव्यांगांना एअरलाईन प्रवास करु देत नाही, तसे आमचे धोरण आहे. तुम्हाला तुमची व्हिलचेअर विमानात नेता येणार नाही", असे उत्तर देऊन त्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली.

माझा अपघात झाल्यामुळे ३५ वर्षांपासून मी व्हिलचेअरवर आहे. इतकी वर्षे मी जगभर व्हिलचेअरवरच प्रवास केला आहे. माझ्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला दिव्यांग असल्याने प्रवास नाकारला जात असेल तर सामान्यांचे काय हाल होत असतील ? असा प्रश्न प्रभू यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT