मुंबई : राज्यातील सर्व विभागांच्या सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते बारावीत शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची यू डायस प्लस व सरल पोर्टलमधील स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी आवश्यक असताना अद्याप ५.२८ टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा १४ एप्रिल २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सद्यस्थितीत राज्यात एकूण ९४.७२ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित झाले आहे.