डॉ. सुधाकर पठारे यांचा तेलंगणात कार अपघातात मृत्यू झाला.  Pudhari Photo
मुंबई

डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन

DCP Sudhakar Pathare | तेलंगणात देवदर्शनासाठी जाताना कारची ट्रकला धडक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई पोलिस पोर्ट झोनचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचा आज (दि.२९) कार अपघातात मृत्यू झाला. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात होते. यावेळी त्यांच्या कारची आणि ट्रकची धडक झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. (DCP Sudhakar Pathare)

आज सकाळी ते त्यांच्या एका नातेवाईकासोबत ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे.

आयपीएस सुधाकर पठारे यांचे शिक्षण

सुधाकर पठारे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील वलवणे गावात झाला. एमएसस्सी (कृषी) आणि एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या पठारे यांनी आयपीएस होण्यापूर्वी अनेक सरकारी विभागात अधिकारी म्हणून काम केले होते. ते १९९५ मध्ये सरकारी सेवेत रुजू झाले.

यापूर्वी जिल्हा विशेष लेखापरीक्षक होते, त्यानंतर १९९६ मध्ये त्यांची विक्रीकर अधिकारी वर्ग १ म्हणून निवड झाली. त्यानंतर १९९८ मध्ये ते पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस विभागात रुजू झाले.

सुधाकर पठारे यांचा कार्यकाळ

सुधाकर पठारे यांनी त्यांच्या कारकिर्दीत पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर, राजुरा येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर, वसई आणि सीआयडी अमरावती येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले. त्याचबरोबर त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई आणि ठाणे शहरात पोलीस उपायुक्त म्हणून काम केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT