Iqbal Kaskar Latest News  File Photo
मुंबई

Iqbal Kaskar Latest News | दाऊदचा भाऊ इकबाल कासकरचा ठाण्यातील फ्लॅट ईडीकडून जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल कासकर याने खंडणी स्वरूपात हडपलेल्या ठाण्यातील फ्लॅट ईडीने जप्त करीत सील केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

ठाण्यातील कासारवडवली येथील एका बिल्डर कडून खंडणी उकळल्या प्रकरणी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याचे साथीदार मुमताज शेख व इसरार सय्यद या दोघाना 18 सप्टेंबर 2017 रोजी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने नागपाडा येथून अटक केली होती.

इकबाल याने संबंधित बिल्डरने उभारलेल्या जमिनीची जागा आपण घेतल्याचा दावा करत सेटलमेंटच्या नावाखाली या बिल्डरच्या कासारवडवली मधील इमारतातीत फ्लॅट आणि तीस लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतले होते. त्यानंतर ठाणे पोलिसांनी तिघांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

तेव्हा पासून इकबाल कासकर व त्याचे साथीदार तुरुंगात आहेत. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने दाऊद इब्राहिम व त्याच्याशी संबंधित गुन्हेगारांनी दाऊदच्या नावाने केलेल्या मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता. ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची चौकशी करून त्यास 18 फेब्रुवारी 2022 रोजी मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागासाठी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

दरम्यान, ईडीच्या तपासात असे आढळून आले आहे की, इक्बाल कासकर याने त्याचा साथीदार मुमताज शेखच्या नावावर कासारवडवली येथील एका बिल्डरकडून फ्लॅट व रोख रक्कम खंडणी स्वरूपात उकळली होती. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग करण्यात येऊन हा सारा बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर ईडीने ठाण्यातील 55 लाखाची ही मालमत्ता जप्त केली आहे.

अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकरशी जवळीक असल्याने आरोपी इक्बाल कासकर, मुमताज शेख आणि इसरार अली जमील सय्यद यांनी ठाण्यातील एक फ्लॅट मुमताज एजाज शेख याच्या नावावर खंडणी स्वरूपात घेतला होता.

उपरोक्त फ्लॅट व्यतिरिक्त, त्यांच्या मागणीनुसार 10 लाख रुपयांचे एकूण 4 धनादेश बिल्डरने इकबालला दिले होते. तर हे चेक वटवण्यासाठी कासकर व त्याच्या साथीदारांनी काही बँक खाती उघडली होती. ही खाती फक्त रोख रक्कम काढण्यासाठी चालवली जात होती आणि या खात्यांमध्ये इतर कोणतेही व्यवहार केले जात नव्हते, असे देखील ईडीच्या तपासातून समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT