मुंबई

दादरच्या McDonald मध्ये स्फोट होणार; पोलिस कंट्रोल रूमला धमकीचा कॉल

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला आहे. त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील दादर भागात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार असल्याची माहिती दिली. पुढील तपास मुंबई पोलिस करत आहेत. threat call

एएनआय च्या 'X' पोस्टनुसार, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला, कॉल करणाऱ्या व्यक्तीने म्हटल आहे की,  "मुंबईतील दादर भागात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार आहे:" त्याने असेही सांगितले की, तो बसमध्ये प्रवास करत होता जेव्हा त्याने दोन लोक मॅकडोनाल्ड उडवण्याबद्दल बोलत असल्याचे ऐकले. कॉल केल्यानंतर ताबडतोब, संपूर्ण तपास करण्यात आला. मात्र, या ठिकाणी पोलिसांना संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, असे एएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे.threat call

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT