मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी व सीएसएमटी-वांद्रे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी, वांद्रे व गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा 5 तास बंद राहणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगावदरम्यान धीम्या गतीच्या अप आणि डाऊन मार्गावर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.
सीएसएमटी ते विद्याविहार : 10.55 ते 15.55
सीएसएमटी येथून सकाळी 10.48 वाजल्यापासून 15.45 वाजेपर्यंत सुटणार्या धीम्या लोकल सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर स्थानक येथून सकाळी 10.19 वाजल्यापासून 15.52 वाजेपर्यंत सुटणार्या अप धीम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
सीएसएमटी -चुनाभट्टी : 11.40 ते 4.40
चुनाभट्टी ते सीएसएमटी : 11.10 ते 4.10
सीएसएमटी येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते संध्याकाळी 4.43 पर्यंत वांद्रे, गोरेगावला जाणार्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील.ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवासी 10 ते 6 या वेळेत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करू शकतात.
बोरिवली-गोरेगाव : 10 ते 3
बोरिवली ते गोरेगावदरम्यान धीम्या गतीच्या मार्गावरील लोकल जलद गतीच्या मार्गावर चालवण्यात येणार. बोरिवलीच्या एक, दोन, तीन व चार या प्लॅटफॉर्मवर एकही ट्रेन थांबणार नाही.