सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिलने दाखल केलेल्या विनयभंग प्रकरणी सत्र न्यायालयाने क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.  file photo
मुंबई

Prithvi Shaw : क्रिकेटपटू पृथ्वी शॉला कोर्टाने ठोठावला १०० रुपयांचा दंड ! 'सपना गिल' प्रकरणी कारवाई

विनयभंग प्रकरणी सत्र न्यायालयाच्या उत्तर सादर करण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष भाेवले

पुढारी वृत्तसेवा

Prithvi Shaw fined Rs 100 in Sapna Gill case : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिलने दाखल केलेल्या विनयभंग प्रकरणी सत्र न्यायालयाने क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. वारंवार आदेश देऊनही उत्तर दाखल न केल्याने दिंडाेशी सत्र न्यायालयाने ही कारवाई केली. मंगळवारी ( ९ सप्टेंबर) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने शॉला उत्तर दाखल करण्यासाठी शेवटची संधी देत, प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबरपर्यंत तहकूब केली. दरम्यान, पृथ्वी शॉ सध्या महाराष्ट्र संघाकडून देशांतर्गत स्पर्धेत खेळत आहेत.

नेमके प्रकरण काय आहे?

१५ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईतील अंधेरी येथील एका पबमध्ये पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात वाद झाला होता. या वादाची सुरुवात सेल्फी घेण्यावरून झाली. सपना गिलच्या मित्राने वारंवार शॉसोबत सेल्फी घेण्याचा आग्रह केला. सुरुवातीला शॉने होकार दिला, पण नंतर नकार दिल्यावर बाचाबाची झाली. सपान गिलने आरोप केला आहे की, शॉने सेल्फीला नकार दिल्यानंतर तिच्या मित्राचा फोन हिसकावून घेतला आणि फेकून दिला. त्यानंतर, तिने मध्ये पडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, शॉने तिच्यावर हल्ला करून विनयभंग केला. या घटनेनंतर गिलने एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली; मात्र कारवाई न झाल्याने तिने सत्र न्‍यायालयाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात उशीर झाला असल्याचे न्यायालयाने एप्रिल २०२४ मध्ये स्पष्ट केले हाेते. तसेच आरोप गंभीर असल्याने तपासाची आवश्यकता असल्याचे नमूद करून संताक्रुझ पोलिसांना तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले हाेते.

न्यायालयाने शॉला दिले होते प्रत्युत्तर सादर करण्याचे निर्देश

या प्रकरणी सत्र न्यायालयाने वारंवार शॉ यांना प्रत्युत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. सपना गिल यांचे वकील अ‍ॅड. अली काशिफ खान यांनी सांगितले की, शॉ मुद्दामहून न्यायालयीन प्रक्रियेत विलंब करत आहेत. “तो समन्सकडे दुर्लक्ष करत असून, सुनावणी लांबवणे हा त्यांचा उद्देश आहे,” असे त्यांनी म्हटले. यावर सत्र न्यायालयाने शॉला १०० रुपयांचा दंड ठोठावला. दिंडाेशी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले की, “या प्रकरणी पृथ्वी शॉ यांनी अद्याप प्रत्युत्तर दाखल केलेले नाही. त्यांना अजून एक संधी दिली जाते, मात्र त्यासाठी १०० रुपये खर्च आकारण्यात येईल.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT