मुंबई : प्रकाश साबळे
मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशीनुसार त्यांच्या कुटुंबियांना अनुंकपा तत्वावर( वारसा हक्कानुसार) पालिकेत नोकरी दिले जाते. मात्र यात काही बोगस कागदपत्रे देवून नोकरी मिळविणे, कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही प्रकरण प्रलंबित ठेवणे, नोकरीसाठी लाच मागणे अशाविविध प्रवृत्तीना आता मात्र चाप बसणार आहे. कारण महापालिकेने नवीन परिपत्रक काढून परिमंडळीय स्तरावर वारसाहक्क मंजूरी समिती आणि मॉनिटरिंग कमिटीची स्थापना केली आहे. यामुळे प्रलंबित प्रकरणे लवकर मार्गी लागण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या वारसांना नोकरी मिळण्यासाठी महापालिकेने सुधारित परिपत्रकात प्रकरणे तयार करणे, तपासणी करणे, पडताळणी करणे, मंजूर / नामंजूर करणे, नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करणे,अहवाल सादर करणे, वेळोवेळी आढावा घेऊन प्रकरणे जलद गतीने निकाली काढली जातील याची दक्षता घेणे आणि देखरेख समिती (मॉनिटरिंग कमिटी) बैठक दोन महिन्यातून एकदा आयोजित करणे आदीं परिशिष्टे नवीन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहेत.
नव्या परिपत्रकामध्ये वारसाहक्क प्रकरणांशी मूळ नस्ती जतन करण्यासाठी तसेच कागदपत्रात कोणतेही फेरफार होणार नाही, याबाबतची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकारी/प्रशासकीय अधिकारी यांची असेल. तसेच सदर मूळ नास्ती त्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांची वैयक्तिकधारीणी म्हणून परिरक्षीत राहिल, असेही नमूद करण्यात आले आहे.
यांना वारसाहक्कानुसार मिळते नोकरी
घनकचरा व्यवस्थापन :- घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याबाबतचे धोरण 1975 पासून लागू केलेले आहे. यामध्ये सफाई कामगार, मोटरलोडर, स्कॅव्हेंजर, हलालखोर, ड्रेनक्लिनर, स्वीपर कम हलालखोर, स्वीपर कम ड्रेनक्लिनर, ड्रेनक्लिनर कम स्वीपर, स्कॅव्हेंजर कम हलालखोर, कामगार आणि मुकादम
आता या विभागातही वारसाहक्क नोकरी :- मालमत्ता, सार्वजनिक आरोग्य खाते, बाजार, शिक्षण, मलनि:सारण तसेच सर्व विभागीय कार्यालये व इतर सर्व खाते
मंजुरी समिती
अध्यक्ष - परिमंडळीय उपायुक्त/ सह आयुक्त
सचिव - सह प्रमुख कामगार अधिकारी
सदस्य - मुख्य पर्यवेक्षक/ उप मुख्य पर्यवेक्षक
सदस्य - विभागातील प्रशासकीय अधिकारी(घकव्य)
देखरेख समिती
अध्यक्ष - अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर)
उपाध्यक्ष - उप आयुक्त (सामान्य प्रशासन)
सचिव - प्रमुख कामगार अधिकारी