मुंबई : महापालिकेच्या कूपर रुग्णालयात एका महिला रुग्णाला उंदराने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली होती. यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, प्रत्यक्षात महिनाभरात तेथे तिच्यासह सात रुग्णांना उंदरांनी चावा घेतल्याचे आता समोर आले आहे.
सामाजिक कार्यकर्ता चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकाररा मागविलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे. मुंबई महापालिकेच्या कुपर, केईएम रुग्णालयांत उंदरांचा दहशतीचे व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. कुपर रुग्णालयात 5 सप्टेंबर रोजी 85 वर्षांच्या महिला रुग्णाला रुग्ण खाटेवर उंदरांनी चावा घेऊन जखमी केले होते. उंदरांनी त्यांच्या हातांवर इतक्या खोल जखमा केल्या की हाड दिसत होती. याबाबत जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यावेळी या व्यतिरिक्त आणखी सहा जणांना उंदरानी चावा घेतल्याच्या तक्रारी आल्या होत्या, पण पालिका प्रशासनाने अन्य रूग्ण नसल्याचा दावा केला होता.
याबाबत सामाजिक कार्यकर्ता चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. यात ऑगस्ट ते सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीत कुपर रुग्णालयात सहा रूग्णांचा उंदरांनी चावा घेतल्याच्या तक्रारी जुहू पोलिस ठाण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे.