Ajit Pawar Plane Crash Investigation Pudhari
मुंबई

Ajit Pawar Death Case | विमान अपघातप्रकरणी एफआयआर दाखल करा; मगच बारामती मतदारसंघातून माघारीबाबत निर्णय घेऊ, काँग्रेसची अट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात घटनेबाबत आमदार रोहित पवार हे महाराष्ट्रात एफआयआर दाखल करा , यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करत आहेत. पण साधा एफआयआर दाखल करून घेण्याबाबत अजित पवार गट ज्या सरकारमध्ये आहे ते सरकार संवेदनशील नाही. त्यामुळे महाराष्ट्रात एफआयआर दाखल करा, मग बारामतीतून माघारीबाबत निर्णय घेऊ, ही काँग्रेसची अट आहे, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमवारी स्पष्ट केले.

बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून महायुती आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हाके यांची निवडणुकीतून माघार पवार कुटुंबीयांवर टीका करून बारामती तालुक्यात गावोगावी भेटी देणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अखेरच्या दिवशी बारामतीच्या मैदानातून सपशेल माघार घेतली.

काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक

अर्ज भरण्यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री, तसेच त्यांच्या सासुबाई आशाकाकी पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. दादांच्या आठवणींनी भारावून गेलेल्या सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले, तर उपस्थित कुटुंबीय आणि ग्रामस्थ देखील काही काळ स्तब्ध झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT