Computer Programmer Locked Himself
मुंबई : एका डिप्रेशनमध्ये गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तिने स्वतःला तिन वर्षे एका फलॅटे मध्ये कोंडून घेतले होते.केवळ ऑनलाईन फूड ऑर्डर करुन तीन वर्षे जगला पण ज्यावेळी त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली त्यावेळी शेजाऱ्यायांनी चौकशी सरु केली त्यावेळी अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला. नवी मुंबईतील जुईनगर सेक्टर २४ मध्ये घारकूल येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेजाऱ्यांकडून एका सामाजिक संस्थेला कळल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
अनुप कुमार नायर असे या व्यक्तिचे नाव असून तो कॉम्पूटर प्रॉग्रॅमर आहे. डिप्रेशनमध्ये गेल्याने तीन वर्षे त्याने जगाशी सपंर्क तोडला होता. जेव्हा त्याचा अवतार शेजारयांनी पाहिला तेव्हा धक्का बसला. केस दाढी वाढलेली, मळकट चेहरा एखाद्या जंगलातून आलेल्या मानवासारखा त्याचा अवतार होता. तसेच त्याचा फ्लॅट ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणाचे पॅकिंग, कपडे, व इतर कचऱ्यांने भरलेला होता. तसेच अनेक ठिकाणी मानवी विष्ठाही पडली होती. या कचऱ्यात व मानवी विष्ठेतच तो राहत होता.
या व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून समाजापासून आणि कुंटुंबापासून पूर्णपणे संपर्क तोडला होता. या व्यक्तीच्या फ्लॅटमधील परिस्थिती इतकी बिकट होती की अनेकांना ते पाहून धक्का बसला. आता त्याला फ्लॅटमधून बाहेर काडले असून त्याबरोबरच त्याच्यावर वैद्यकीय उपचारही सुरु केले आहेत.
या सामाजिक संस्थेला नायर यांच्याविषयी माहिती कळाल्यानंतर ते नायर याच्या प्लॅटमध्ये पोहचले तेव्हा तो अतिशय बिकट परिस्थिती दिसून आला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने कॉम्पुटर प्रॉग्रॅमर म्हणून काम केले असल्याचे कळाले. तसेच त्याची आई पुर्णिमा नायर ही इंडियन एअर फोर्समध्ये काम करत होती तर वडील व्ही.पी. कुट्टी कृष्णन नायर हे टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत होते अशी माहिती समोर आली आहे.