CM relief fund Pudhari file Photo
मुंबई

CM relief fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 8 तासांत मंजुरी

निधीच्या ऑनलाईन प्रणालीचे लवकरच उद्घाटन; उपचारांना मिळणार गती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. यामुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया 8 तासांत पूर्ण होणार आहे. रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होतील. त्यासाठी रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज करावा लागणार नाही. उपचारांना गती मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन होणार आहे.

या मदत कक्षामध्ये रुग्णस्नेही बदल केले जात आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन हा अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे पाठविला जाईल. तेथे नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया 8 तासांत पूर्ण केली जाईल. यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकाला मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या आर्थिक वर्षात राज्यातील 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी 6 लाख 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन झाल्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणे राबविली जाईल. 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT