मुंबई, पुढारी वृत्तसेवा : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनाची बैठक झाली. या बैठकीला काळजीवाहू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडीओ कॅानफर्सिंगद्वारे उपस्थित होते.
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावेळी आंबेडकरी जनतेची कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. याच नियोजनाचा आढावा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला.
यावेळी शिवसेना नेते उदय सामंत, राहूल शेवाळे, दीपक केसरकर आणि संजय शिरसाट देखील उपस्थित होते. तसेच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी व्हिडीयो कॅानफरसिंगद्वारे उपस्थित होते.