ganesh chaturthi 2025
'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण... अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात आज संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विघ्नहर्त्या गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या मंगलपर्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख राजकीय नेतेही सहभागी झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील 'वर्षा' या आपल्या शासकीय निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांनी राज्याच्या जनतेला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना गणरायाचरणी केली.
गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथील आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केली तसेच देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.
गणेश चतुर्थी निमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले. राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब गणपती दर्शन घेतले.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले.
मुंबई येथील 'सेवासदन' या शासकीय निवासस्थानी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कुटुंबीयांसमवेत विधीपूर्वक पूजन करत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली.
गणेश पूजन करताना शिवसेना नेते श्रीकांत शिंदे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील निवासस्थानी सहकुटुंब विधिवत बाप्पाची पूजा, आराधना केली.
मंत्री पकंजा मुंडे शासकीय निवासस्थान रामटेक येथे मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली.