मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (File Photo)
मुंबई

Cancer Treatment Policy | कर्करोगावर उपचारासाठी धोरण तयार करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, साईनगर, शिर्डी येथे संस्थानाच्या वतीने कर्करोग रुग्णालय उभारणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह संबंधित विभाग, यंत्रणा आणि रुग्णालयांचे प्रमुख उपस्थित होते. कर्करोगावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध पातळ्यांवर कर्करोग उपचार केंद्रांची उभारणी आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नागपूर येथील संत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयाच्या इमारतीचे अपूर्ण बांधकाम तत्काळ पूर्ण करण्यात यावे. त्यासाठीचा आवश्यक निधी पुरवणी मागण्यात देण्यात येईल. तसेच श्री साई संस्थान यांच्या वतीनेही साईनगर शिर्डी येथे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत साई संस्थानाला सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील गरजू व्यक्तीला तत्काळ सेवा मिळाल्या पाहिजे. कर्करोगाशी लढणार्‍या रुग्णांना शीघ्र निदान व प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा, निदान, डे केअर रेडिओथेरेपी आणि केमोथेरपी युनिटची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT